Ram Mandir : राम मंदिरातील दानपेटी घोटाळ्याची SIT चौकशी; कर्मचाऱ्याला ताब्यात, शेणात लपवलेले 10 लाख रुपये जप्त
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानरकमेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, संबंधिताच्या घरातून तब्बल 10 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.