Awami League : ‘’अवामी लीग आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही’’
बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त अब्दुर रहमान मसूद यांनी सांगितले की, अवामी लीग आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. राजशाही येथील प्रादेशिक लोक प्रशासन प्रशिक्षण केंद्रात (आरपीएटीसी) आयोजित ‘आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा आढावा’ या विषयावरील कार्यशाळेत त्यांनी हे विधान केले.