Trainee Aircraft : मध्य प्रदेशात प्रशिक्षणार्थी विमान क्रॅश; विजेच्या तारांना धडकून कोसळले, 90 गावांचा वीजपुरवठा खंडित
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आमगाव येथे एक प्रशिक्षणार्थी विमान 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला धडकून कोसळले. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. प्रशिक्षक पायलट अजित अँथनी आणि प्रशिक्षणार्थी पायलट अशोक छावडा जखमी झाले आहेत. तथापि, दोघेही धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.