Australia : ऑस्ट्रेलियाची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देशाची मान्यता; न्यूझीलंडने म्हटले- आम्हीही विचार करत आहोत
ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सोमवारी सांगितले की, सप्टेंबरमध्ये यावर निर्णय घेतला जाईल. यापूर्वी ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानेही पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा फ्रान्सने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली तेव्हा अल्बानीज म्हणाले होते की ऑस्ट्रेलिया असे कोणतेही पाऊल उचलणार नाही.