Barabanki : बाराबंकीच्या औसनेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 2 जणांचा मृत्यू; जलाभिषेकादरम्यान विद्युत प्रवाहामुळे दुर्घटना, 29 जखमी
उत्तर प्रदेशातील बाराबंकीतील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला आणि मुलांसह २९ जण जखमी झाले. रविवारी रात्री २ वाजता जलाभिषेक दरम्यान मंदिर परिसरात अचानक वीज पसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.