Sheikh Hasina : बांगलादेशात सत्तापालटापूर्वी अधिकाऱ्याशी संभाषणाचा ऑडिओ लीक, हसीना यांनी आंदोलकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिल्याचा दावा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या एका अज्ञात सरकारी अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाचा ऑडिओ लीक झाला आहे. बीबीसीने या ऑडिओला दुजोरा दिला आहे आणि दावा केला आहे की माजी पंतप्रधानांनी गेल्या वर्षी झालेल्या सत्तापालटापूर्वी विद्यार्थी निदर्शकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.