Atishi : आतिशी दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या होणार; आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्र्यांची निवड
माजी मुख्यमंत्री आतिशी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. रविवारी झालेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. अरविंद केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे सर्व 22 आमदार बैठकीला उपस्थित होते.