Astra’ missile : आत्मनिर्भर भारत, स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरसह ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि भारतीय हवाई दल (IAF) यांनी ‘अस्त्र’ बियाँड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल (BVRAAM) ची यशस्वी चाचणी पार पाडली. विशेष बाब म्हणजे या चाचणीत स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सीकर यंत्रणा वापरण्यात आली, जी प्रथमच प्रत्यक्ष चाचणीत यशस्वी ठरली.