Karbi Anglong : कार्बी आंगलोंग हिंसाचार-11 हजार लोक घरात कैद, बाजार बंद; सैन्याचा 12 गावांमध्ये फ्लॅग मार्च
आसाममधील 12 लाख लोकसंख्या असलेल्या स्वायत्त कार्बी आंगलोंगमध्ये सध्या तुम्ही कोणाशीही बोललात, तर कदाचित उत्तर मिळणार नाही, कारण हिंसेची भीती लोकांच्या मनात आणि डोक्यात बसली आहे. घरांमधील चुली थंड पडल्या आहेत. बाजार बंद आहेत. मोबाइल डेटा सेवा बंद आहे.