Ashwini Vaishnaw : सरकारने १८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली
केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाच्या ४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांची एकूण किंमत १८,६५८ कोटी रुपये आहे. महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगडमधील १५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे १२४७ किमीने वाढेल.