Ashwini Vaishnav : बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत धावणार, पुढील ५ वर्षांत १००० नवीन गाड्यांची योजना , रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२७ पर्यंत धावणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यासोबतच पुढील पाच वर्षांत १,००० नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा आराखडा केंद्र सरकारने आखला असून, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून भारत रेल्वे उत्पादन क्षेत्रात जागतिक आघाडीवर पोहोचत आहे, असे त्यांनी सांगितले.