Asaram-Narayan Sai’ : आसाराम-नारायण साईच्या कट्टर अनुयायाला यूपीतून अटक; तामराज 6 राज्यांत होता वाँटेड, धर्म बदलून स्टीफन बनला
गेल्या दहा वर्षांपासून फरार असलेला आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांचा कट्टर अनुयायी ताम्रध्वज उर्फ तामराजला अखेर १० वर्षांनी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. आसारामविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अनेक लोकांच्या हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी आरोपी ६ राज्यांमध्ये हवा होता. एवढेच नाही तर हरियाणा सरकारने त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.