आधीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून देणाऱ्या मुंबईत असदुद्दीन ओवैसींचा AIMIM पक्ष एकटा देणार 50 उमेदवार; कुणावर होणार परिणाम??
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.