Mumbai : मुंबई उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला नोएडातून अटक; मुंबई पोलिसांना व्हाट्सॲपवर लिहिले होते- 34 वाहनांमध्ये 400 किलो RDX
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अश्विनी असे आहे, तो मूळचा बिहारचा आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. आरोपीला नोएडाच्या सेक्टर-११३ येथून पकडण्यात आले. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.