• Download App
    Arrest warrant | The Focus India

    Arrest warrant

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला; कारवाईसाठी CM कडे; कधीही अटक शक्य

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

    Read more

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

    राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    Taliban : तालिबान नेत्यांविरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचे अटक वॉरंट; महिलांवरील अत्याचाराचे आरोप

    आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) ८ जुलै रोजी तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा आणि अफगाणिस्तानचे मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.या दोघांवरही अफगाण महिला, मुली आणि तालिबानच्या कठोर लिंग धोरणांना विरोध करणाऱ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे वॉरंट मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याखाली जारी करण्यात आले आहेत.

    Read more

    PM security : PM सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट; पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचे कलम जोडले

    पंजाबमधील पीएम नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा 3 वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. ज्यामध्ये हत्येचा प्रयत्नाचे कलमही जोडण्यात आले आहे.

    Read more