Republic Day : 5 जानेवारीपासून मिळतील प्रजासत्ताक दिन परेड-2026 ची तिकिटे; किंमत ₹20 ते ₹100
संरक्षण मंत्रालयाने रविवारी कर्तव्य पथावर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या परेडसाठी तिकिटांच्या विक्रीची घोषणा केली आहे. एका निवेदनानुसार, ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य परेड, बीटिंग रिट्रीटची फुल ड्रेस रिहर्सल आणि मुख्य बीटिंग रिट्रीट समारंभाच्या तिकिटांची विक्री ५ जानेवारीपासून सुरू होईल.