Army Chief General Dwivedi : लष्करात महिला-पुरुषांसाठी समाननिकष लावण्याचा प्रयत्न- जन. द्विवेदी; लष्करप्रमुखांनी घेतली पहिलीच पत्रकार परिषद
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी महिलांच्या युद्धातील भूमिकेबाबत लष्कराचा दृष्टिकोन स्पष्ट केला. मंगळवारी २०२६ च्या पहिल्या पत्रकार परिषदेत जनरल द्विवेदी म्हणाले की, भारतीय लष्कर ‘लैंगिक समानता’ नव्हे, तर ‘लैंगिक तटस्थता’ (जेंडर न्युट्रॅलिटी) या दिशेने पुढे जात आहे. महिलांना कोणत्याही रूपात ‘कमकुवत किंवा असुरक्षित वर्ग’ म्हणून पाहिले जाऊ नये.