Imran Khan : इम्रान म्हणाले- मला काही झाल्यास मुनीर जबाबदार; सुटकेसाठी 5 ऑगस्टपासून देशभर निदर्शने
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटले की, जर त्यांना काही झाले तर त्यासाठी लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असतील. इम्रान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) नुसार, इम्रान म्हणाले की, अलिकडच्या काळात तुरुंगात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्याशी होणारे गैरवर्तन वाढले आहे.