Delhi Police : दिल्लीत आयएसआयशी संबंधित शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, 10 पिस्तुले जप्त, ड्रोनद्वारे पाकमधून यायची शस्त्रे
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी चार तस्करांना अटक करत १० परदेशी बनावटीची पिस्तुले आणि ९२ काडतुसे जप्त केली. यात ३ तुर्की बनावटीचे पीएक्स-५.७ पिस्तूल, पाच चिनी बनावटीचे पीएक्स-३ पिस्तुलांचा समावेश आहे. ही पिस्तुले विशेष दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाचे मॉडेल आहेत.