Defence Ministry : तिन्ही सशस्त्र दलांसाठी 79,000 कोटींच्या शस्त्रे खरेदीस संरक्षण मंत्रालयाची मान्यता; प्रगत नाग क्षेपणास्त्र प्रणाली, सुपर रॅपिड गनचा समावेश
संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सुमारे ₹७९,००० कोटी किमतीची प्रगत शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DAC) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.