Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती
ब्रिटनमधील शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या वाड्रा यांच्या आर्थिक संबंधांच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती तथा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची पाच तास चौकशी केली.