अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये बर्फाळ वादळाचा धोका; आणीबाणी घोषित, 20 कोटी लोकांवर संकट
अमेरिकेत बर्फाच्या वादळाच्या इशाऱ्यानंतर 15 राज्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर, दोन दिवसांत 7000 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिस (NWS) नुसार, 20 कोटी म्हणजेच सुमारे दोन-तृतीयांश अमेरिकन या वादळाच्या तडाख्यात येऊ शकतात.