Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींना टोला, सरकार असल्याच्या थाटात वागू नये; शनिवारवाड्याबाहेरील राड्यावरून सुनावले
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याच्या आवारातील नमाज पठणावरून झालेल्या वादात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट लक्ष्य केले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या शनिवार वाड्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, तिथे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे ‘इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये,’ असा सणसणीत टोला गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना लगावला.