Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण; सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागवला अहवाल; दिवाळीला फक्त 9 AQI स्टेशन कार्यरत होते
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणाच्या प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एमसी मेहता प्रकरणाची सुनावणी सुरू होती.