PM Modi : पीएम मोदींच्या हस्ते 51 हजार रोजगार पत्रे वाटप; म्हणाले- तरुणांचे कौशल्य हे भविष्यातील सर्वात मोठे भांडवल
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी १६ व्या रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना नोकरी पत्रे वाटली. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले की, तरुणांची क्षमता ही आपल्या भारताच्या भविष्याचे सर्वात मोठे भांडवल आणि हमी आहे. आमचे सरकार या भांडवलाला समृद्धीचे स्रोत बनवण्यात गुंतलेले आहे.