Eknath Shinde : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.