APP office : ‘तीन महिन्यांपासून भाडे मिळाले नाही’, घरमालकाने ‘APP’ कार्यालयाला ठोकले कुलूप
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यालयाला घरमालकाने कुलूप लावले आहे. घरमालकाचा आरोप आहे की तीन महिन्यांपासून ऑफिसचे भाडे दिले गेले नाही. यामुळे त्यांना ऑफिस बंद करावे लागले. भोपाळमधील आम आदमी पार्टीचे कार्यालय भाड्याच्या घरात चालत होते.