Kangana Ranaut : कंगना यांनी भटिंडा कोर्टात मागितली माफी, म्हणाल्या- गैरसमज झाला, माझा तसा हेतू नव्हता
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोमवारी एका मानहानीच्या खटल्यात भटिंडा न्यायालयात हजर झाल्या. त्यांनी एका वृद्ध शेतकऱ्याबद्दल केलेल्या ट्विटबद्दल माफी मागितली. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक गैरसमज झाला आहे. मी आईला (वृद्ध शेतकरी) संदेश पाठवला आहे की ती गैरसमजाची बळी ठरली आहे. माझा असे करण्याचा हेतू नव्हता.