Anti-Sikh riots : शीखविरोधी दंगली; निर्दोष सुटलेल्या 6 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
१९८४च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित ६ प्रकरणांमध्ये निर्दोष सुटलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या अपीलावर सुनावणी करताना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींकडून २१ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे.