Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाने मुकुल रॉय यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले; पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत निर्णय
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यत्व पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत रद्द केले. न्यायमूर्ती देबांशू बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना रॉय यांना राज्य विधानसभेतून अपात्र ठरवले.