Annamalai : तामिळनाडूमध्ये भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले, अन्नामलाई यांच्या जागी आता नयनार नागेंद्रन!
भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूमधील नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर केले आहे. चेन्नई येथील पक्षाच्या बैठकीनंतर भाजप आमदार नयनर नागेंद्रन यांना भाजप तामिळनाडू युनिटचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.