Mitkari : मिटकरींकडून डीएसपी अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी; IPS अधिकाऱ्याला छळले तर कोर्टात खेचेन, दमानियांचा इशारा
सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना कॉल लावला होता. त्यानंतर अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याला दम भरल्याचे समोर आले.