Anjali Damaniya : लक्ष्मण हाकेंनी ‘मौन आंदोलन’ 12 महिने 13 काळ करावे; अंजली दमानियांचा टोला
मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत महायुती सरकारची चांगलीच कोंडी केली होती. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या व आरक्षणासंदर्भातील जीआर काढला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. बेकायदा मागणीसाठी हे आंदोलन होते तसेच मुख्यमंत्री हतबल असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसेच आता त्यांनी मौन आंदोलन देखील सुरू केले आहे. याव