Anjali Damania : मुंडेंच्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट, लोकप्रतिनिधी नियमाप्रमाणे आमदारकी रद्द करण्याची अंजली दमानिया यांची मागणी
मंत्री धनंजय मुंडे भागीदार असलेल्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचे आहे. लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.