Anjali Damania : राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?; गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारीवरून दमानिया संतापल्या
महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, “राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.