Anjali Damania : प्रतिभा चाकणकरांनी खोटे बोलून हात झटकले; KYC केलेले खाते बनावट कसे असू शकते? दमानियांचा सवाल
नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया यांनी चाकणकर कुटुंब आणि आरोपी अशोक खरात यांच्यातील कथित संपर्काची धक्कादायक आकडेवारीच सादर केली.