• Download App
    Anjali Damania Ashok Kharat CDR leak April 2026 | The Focus India

    Anjali Damania Ashok Kharat CDR leak April 2026

    Uday Samant : एकनाथ शिंदेंचाही अशोक खरातला कॉल! दमानियांच्या गौप्यस्फोटावर उदय सामंतांनी दिले प्रत्युत्तर

    नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more