PM Modi : भटक्या कुत्र्यांच्या वादावर मोदी म्हणाले- प्राणीप्रेमी गायींना प्राणी मानत नाहीत; सुप्रीम कोर्टाने श्वानप्रेमींच्या बाजूने निकाल दिला होता
देशात भटक्या कुत्र्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी प्राणीप्रेमींवर टीका केली. १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, मी अलीकडेच काही प्राणीप्रेमींना भेटलो. आपल्या देशात असे अनेक प्राणीप्रेमी आहेत आणि विशेष म्हणजे ते गायीला प्राणी मानत नाहीत.