Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे आदेश- वनताराच्या चौकशीसाठी SIT, प्राण्यांची खरेदी व मनी लाँड्रिंगच्या आरोपांची दखल
रिलायन्स फाउंडेशनच्या जामनगर (गुजरात) येथील वनतारा ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू एंड रिहॅबिलिटेशन सेंटरविरुद्धच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एसआयटी स्थापन केली. न्या.पंकज मित्तल आणि न्या. प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. प्राण्यांची अवैध खरेदी, त्यांच्याशी गैरवर्तन, आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर दाखल याचिकांवर हा आदेश देण्यात आला.