Mahayuti : मतदानापूर्वीच महायुतीचा गुलाल! तब्बल 22 उमेदवार बिनविरोध, कोकणातून उघडले विजयाचे खाते
राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम लढतींचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, राजकीय आखाड्यात खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून, सर्वच पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.