Angela Rayner : ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा; घर खरेदीवर कमी कर भरला, चूक मान्य करून पद सोडले
ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक माध्यमांनुसार, त्यांनी कबूल केले की, त्यांच्या नवीन घरासाठी मालमत्ता कर भरताना त्यांनी चूक केली होती आणि त्यांनी निर्धारित करापेक्षा कमी कर भरला होता.