Angad Singh Chandok : सीबीआयचे मोठे यश; अंगद सिंग चांडोकचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण
का मोठ्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार अंगद सिंग चांडोकला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) यश आले आहे. भारतीय नागरिक अंगद सिंग चांडोकवर शेल कंपन्यांचे जाळे तयार करून ऑनलाइन टेक सपोर्ट घोटाळ्याद्वारे अमेरिकन नागरिकांकडून लाखो डॉलर्स चोरल्याचा आरोप आहे. असे म्हटले जाते की त्याने फसवणुकीद्वारे कमावलेले हे पैसे शेल कंपन्यांद्वारे भारत आणि इतर देशांमध्ये हस्तांतरित केले होते. चांडोकला भारतात आणण्यासाठी सीबीआयने खूप मेहनत घेतली आहे.