NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने एनआयएने अटक केलेले संशयित डॉ. आदिल राथेर आणि मदतगार जसीर बिलाल वानी यांना दक्षिण काश्मीरमधील ४ घनदाट जंगलात नेले. ही तीच ठिकाणे आहेत, जिथे दोघांनी कथितरित्या दहशतवाद्यांशी भेट घेतली होती आणि स्फोटापूर्वी दारूगोळ्याची चाचणी केली होती.