एकनाथ शिंदेंशी युती करण्यासाठी आर्थिक फायदा मिळालाय का? वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल
बौद्ध आणि मुस्लिमांविरूद्धच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी ही युती करण्यात आलीय का? हातचे बाहुले बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आणि आर्थिक फायदा मिळालाय का? असा सवालही वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेने आनंदराज आंबेडकर यांना केला आहे.