Amritsar : अमृतसरमध्ये हिमाचल रोडवेजच्या बसवर पुन्हा हल्ला!
अमृतसर बस स्टँडवर हिमाचलमधील सुजानपूरहून आलेल्या बसची काच अज्ञाताने फोडली आणि त्यावर ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिल्याची घटना घडली आहे. बसचालक सुरेश कुमार यांनी सांगितले की, ते सुजानपूरहून अमृतसरला आले आणि बस स्टँडवरील १२ क्रमांकाच्या गेटसमोर बस लावली.