Bachchu Kadu : शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार- प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली, आम्ही मॅनेज झालो असे म्हणतात
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यांच्या शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यभरात त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली जात आहे आणि ‘आम्ही मॅनेज झालो’ असे बोलणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.