Amol Mitkari : अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका, अजितदादांप्रमाणे पहाटे कामाला लागा, स्वत:च्या मुलाच्या पराभवावर भाष्य करा
भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. स्वत:च्या घरात झालेल्या पराभवाचा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांसारखे पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.