Amit Shah : तामिळनाडूबाबत अमित शहांनी भाजपची भूमिका जाहीर करत, केली मोठी घोषणा
शुक्रवारी तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल दिसून आला. भाजप आणि अण्णाद्रमुक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या युतीची घोषणा केली. ते म्हणाले की, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक, भाजप आणि इतर मित्रपक्ष एकत्र येतील आणि एनडीएच्या झेंड्याखाली निवडणूक लढवतील.