Amit Shah : महाकुंभातील दुर्घटनेवर गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले? समोर आली प्रतिक्रिया
महाकुंभमेळ्यात आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताने मला खूप दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. प्रशासन जखमींना रुग्णालयात उपचार देत आहे. मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे.A