Amit Shah : युद्धविराम नाही, शस्त्र खाली ठेवा अन्यथा गोळीला गोळीनेच उत्तर, अमित शहा यांचा नक्षलवाद्यांना ठाम इशारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांमी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला फेटाळून लावत कठोर भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर आत्मसमर्पण करायचे असेल तर थेट बंदुका खाली ठेवा. त्यासाठी युद्धबंदीची गरज नाही. सरकारकडून एका गोळीचाही मारा होणार नाही. पण निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल.”